वर्धा
out-of school-students शाळाबाह्य, अनियमित तसेच स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १५ ते ३१ जुलैदरम्यान विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. दुर्गम भाग, वस्त्या आणि विविध ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात ३९ शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्यात आले.

out-of school-students एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने जिल्हा व तालुका स्तरावरील शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या कर्मचार्यांची या मोहिमेत नियुती करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध कारणांमुळे काही विद्यार्थी शाळाबाह्य राहतात. यापूर्वी ही मोहीम दिवाळीच्या सुमारास राबविली जात होती. मात्र, शैक्षणिक सत्राचा बराच कालावधी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत पंचायत समिती अंतर्गत येणार्या खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गटसाधन केंद्रातील कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून सर्वेक्षण केले जाणार आहे.
out-of school-students दररोजच्या सर्वेक्षणाचा अहवाल जिपच्या शिक्षण विभागाकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. या मोहिमेत कोणतीही हलगर्जी किंवा दुर्लक्ष होऊ नये, असे निर्देश गटशिक्षणाधिकार्यांना देण्यात आले आहे. मोहीम सुरू करण्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि अंगणवाडी पर्यवेक्षकांची बैठक घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिपच्या शिक्षण विभागाने केले आहे.
out-of school-students १५ ते ३१ जुलैदरम्यान प्रत्येक घर, बस स्थानके, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, भोजनालयं, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, वीटभट्ट्या, खाणी, कारखाने, बाल मजुरीची शयता असलेली ठिकाणे, तसेच गावं, वस्त्या, कसबे, तांडे, बेडे आणि जंगलालगतच्या परिसरात विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.