वर्धा
vidarbha-sahitya-sangh विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र मुंढे तर सचिवपदी रंजना दाते यांची निवड करण्यात आली आहे.
vidarbha-sahitya-sangh कार्यकारिणीमध्ये शाखोपाध्यक्ष नीलकंठ मेहेर, सहसचिव संगीता चवरे, कोषाध्यक्ष प्रा. उल्हास लोहकरे, कार्यक्रम समिती प्रमुख स्वाती देशपांडे व सहप्रमुख ज्योती भगत, प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल दाते यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्यांमध्ये डॉ. राजेश देशपांडे, प्रशांत पनवेलकर, मंजुषा चौगावकर, शीला वानखेडे व संजय टोणपे यांचा समावेश आहे. मार्गदर्शक आणि सल्लागार मंडळामध्ये अरुण लेले, प्रा. सरोज देशमुख, डॉ. गजानन कोटेवार, डॉ. विलास देशमुख, डॉ. हेमचंद्र वैद्य, डॉ. महावीर पाटणी, प्रा. शेख हाशम, प्रा. मीनल रोहनकर, ज्योत्स्ना भेंडे, प्रा. श्याम देशपांडे, डॉ. वंदना पळसापुरे (फरसोले) आणि प्रशांत देशमुख हे आहेत.
vidarbha-sahitya-sangh नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन व संधी देण्यासाठी ‘सर्जनाचे उमाळे’ हा नवोक्रम नियमित घेतला जाईल, असे मनोगत नवनियुत अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंढे यांनी व्यत केले.