मानोरा,
encroachments farm road तालुक्यातील उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील किराणा दुकानाचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे वारंवार करण्यात आलेल्या तक्रारींवर गेल्या ३ वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न झाल्याने गावातील शेतकर्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याबाबत राजेश बाबुराव राठोड यांच्यासह इतर शेतकर्यांनी तहसीलदार राजेंद्र पाटील यांना १३ जुलै रोजी निवेदन देऊन तातडीने अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, गैरअर्जदार पंडित भावसिंग राठोड, रा. उमरी खु. यांनी पांदन रस्त्यावर किराणा दुकानाचे अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटवून पांदन रस्ता खुला करावा यासाठी राजेश राठोड यांनी आतापर्यंत सहा वेळा विविध स्तरावर प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, सबंधित कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पांदन रस्ता बंद असल्यामुळे ७८ शेतकरी खातेदारांच्या शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकर्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन गैरअर्जदाराचे पांदन रस्त्यावरील दुकानाचे अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून शेतकर्यांना त्यांच्या शेतात जाता येईल, अशी मागणी केली आहे.encroachments farm road प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा १४ ऑगस्ट पासून तहसील कचेरीसमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. बाबुसिंग महाराज राठोड, आ. सईताई डहाके, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आदींना पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले असून, तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने शेतकर्यांची उपस्थिती होती.