आष्टी (श.)
two-wheeler-stolen तालुयातील माणिकवाडा येथील वनविभागाच्या कार्यालयातून वनपालाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवार १४ रोजी मध्यरात्री घडली. ती घटना शेजारील दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली. या प्रकरणी तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
two-wheeler-stolen माणिकवाडा येथील वनविभाग कार्यालयात वनपाल देविदास धुर्वे हे रात्री मुक्कामी होते. अज्ञात चोरट्याने कार्यालय परिसरात उभी असलेली एम. एच. ३२ ए. बी. ०२९७ क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. सकाळी उठल्यावर दुचाकी न दिल्याने परिसरात शोध घेण्यात आला. दुचाकी मिळून आली नाही.
two-wheeler-stolen दरम्यान, शेजारील दुकान परिसराल लावलेल्या सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासण्यात आल्यावर चोरटे दुचाकी चोरून नेताना दिसले. त्यानंतर आष्टी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली.