मुंबई
warkari pandharpur आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाèया लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. वारीदरम्यान कोणतीही दुर्घटना किंवा अपघात घडल्यास वारकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२६ लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे वारीत सहभागी होणाऱ्यां भाविकांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळणार असून, अपघातामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
warkari pandharpur यंदा आषाढी वारीचा कालावधी ७ जुलै ते २५ जुलै २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या संपूर्ण कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या आणि वारीत सहभागी होणाऱ्या पात्र वारकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरवर्षी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी पायी दिंड्यांसह पंढरपूरला पोहोचतात. दीर्घ पायी प्रवास, गर्दी आणि बदलते हवामान यामुळे अपघात किंवा आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. याच पृष्ठभूमीवर ही योजना महत्त्वाची मानली जात आहे.
warkari pandharpu योजनेनुसार, वारीदरम्यान एखाद्या वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या निकटच्या वारसाला चार लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच एखाद्या अपघातात संबंधित वारकऱ्याला 60 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये मदत मिळेल. जर अपघातामुळे ६० टक्क्यांपर्यंत अपंगत्व आले, तर अशा वारकऱ्याला ७४ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याशिवाय उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाèया वारकèयांचाही विचार करण्यात आला आहे.
warkari pandharpu योजनेत उपचार खर्चासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या वारकèयाला अपघातानंतर एक आठवड्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्यास 16 हजार रुपयांची मदत मिळेल. तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास ५ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
warkari pandharpu वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी दरवर्षी पायी प्रवास करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन प्रसंगी आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
warkari pandharpu दरम्यान, वारीत सहभागी होणाèया वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, आरोग्याची काळजी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. शासनाच्या या योजनेमुळे वारीदरम्यान दुर्घटना घडल्यास संबंधित कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.