विवाहितेला एमडी देऊन सामूहिक बलात्कार

- दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
married-woman-gang-raped : कम्प्युटर क्लासमध्ये ओळखी झालेल्या दोन मित्रांनी एका २२ वर्षीय विवाहितेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिला एमडी खायला देऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनुराग कटारिया (वय २५ वर्ष) आणि आशिष शास्त्री (वय २५) रा. दहेगाव रंगारी अशी आरोपींची नावे आहेत.
 

ngp 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय महिला संजना (काल्पनिक नाव) ही खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. नवविवाहित असलेल्या महिलेने काम्प्युटर क्लास लावला. १ नोव्हेंबर २०२४ मध्ये तिची ओळख क्लासमधील अनुराग कटारिया याच्याशी ओळख झाली. दोघांची काही दिवसांत मैत्री झाली. दोघेही सोबत फिरायला जात होते. यादरम्यान, अनुरागला एमडीचे व्यसन लागले. त्याने संजनालाही एमडी खाण्यासाठी प्रोत्साहन दिले. गेल्या दीड वर्षांपासून एमडी खाण्याची सवय लावली. त्यानंतर त्याने आशिष शास्त्री या मित्राशी ओळख करुन दिली. या दोघांनी तिने संजनाला स्वतःच्या रुमवर नेऊन तिला एमडी खाऊ घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
 
 
तक्रारीसाठी पतीने दिले पाठबळ
 
 
अनुराग आणि आशिष यांनी वारंवार संजनाला शारीरिक संबंधासाठी बाध्य केले. तिच्या घरात घुसून दोघांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. या दोघांचाही त्रास सहन न झाल्यामुळे तिने पतीला सांगितले. पतीने तिला पोलिस तक्रारासाठी पाठबळ दिले. दोघेही खापरखेडा पोलिस ठाण्यात पोहचून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींचा शोध सुरु आहे.