वॉशिंग्टन,
Mojtaba Khamenei finished अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी क्षमतेबाबत मोठा दावा करत, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमुळे इराणची लष्करी ताकद जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर ठार झाल्याचा दावा केला. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणकडे आता प्रभावी नौदल किंवा हवाई दल उरलेले नाही. तसेच देशाची विमानविरोधी संरक्षण यंत्रणाही नष्ट झाली असून सर्वोच्च लष्करी नेतृत्वाला मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. याच मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईन यांचे पुत्र मोजतबा खामेनेईन यांच्याबाबतही दावा केला. "मोजतबा खामेनेईन ९० टक्के संपले आहेत," असे विधान त्यांनी केले. २८ फेब्रुवारीपासून मोजतबा खामेनेईन सार्वजनिक ठिकाणी दिसले नसल्यामुळे त्यांच्या स्थितीबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

दरम्यान, अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून शुल्क आकारण्याचे संकेत दिले. आतापर्यंत अमेरिका जागतिक नौकानयनाच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देत होती. मात्र, ट्रम्प यांच्या नव्या भूमिकेमुळे या धोरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घडामोडींनंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन टँकर्सवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. या हल्ल्यात एका भारतीय वंशाच्या खलाशाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर २० टक्के शुल्क आकारण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर इराणने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "२० टक्के शुल्क खूप जास्त आहे. आम्ही वाजवी दर आकारू," असे इराणने म्हटले आहे.