भोजशाळा प्रकरणात मुस्लिम पक्षाला नमाजासाठी जागा पण...

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
धार,
New decision in the Bhojshala case मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा अंतरिम आदेश देत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, मुस्लिम पक्षाला दिलासा देताना प्रत्येक शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळेत परिसराजवळ नमाज अदा करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणातील सर्व याचिकांवर नोटीस बजावत संबंधित पक्षांची बाजू लवकरात लवकर ऐकून घेण्याचे स्पष्ट केले. तसेच या वादावर शक्य तितक्या लवकर अंतिम सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले.
 
 
dft577
 
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) ला भोजशाळेच्या सध्याच्या स्थितीत कोणताही बदल करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत परिसराची विद्यमान स्थिती कायम ठेवली जाणार आहे.मुस्लिम पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील हुजैफा अहमदी यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पूर्वीची व्यवस्था अचानक बदलली गेली आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची संधीही मिळाली नाही. तसेच धार्मिक उपक्रमांपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आल्याचा दावा करत उच्च न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार असून, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसारच व्यवस्था कायम राहणार आहे.