हिंगणघाट
public-interaction-program- हिंगणघाट नगरपरिषदेने शहराच्या विकासासाठी प्राधान्यक्रमाने करावयाच्या कामांची यादी तयार करावी. हिंगणघाटच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
public-interaction-program- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणघाट नप कार्यालयातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, नपचे पदाधिकारी, नगरसेवक, उपविभागीय अधिकारी आदी उपस्थित होते.
public-interaction-program- नदीघाट विकास आराखडा, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नगर परिषद शाळांना निधी उपलब्ध करून देणे, नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीसाठी लिफ्ट उभारणी, घाट व जलतरंग तलाव परिसराचा विकास तसेच टाकाऊ जागेवर मैदान उभारणी यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.
public-interaction-program- नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना करा. शहरात संकुल उभारणे, जनसहभागातून वृक्षलागवड करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करा. नागरिकांना मालमत्ता पत्रिका त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकार्यांना त्यांनी दिले. समुद्रपूर येथे डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आली. जनसंवाद कार्यक्रमात नगर परिषद सदस्यांनी शहरातील विविध विकासकामांसंदर्भात पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे निवेदने सादर केली. या निवेदनांवर संबंधित विभागाने कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.