नऊ महिन्यांपासून अन्न-पाण्याविना संघर्ष...!

*दिवाकर वाघमारे यांचा भारतीय आयुर्वेदाने नवा जन्म

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
आजनसरा, 
diwakar waghmare आयुर्वेद ही आपल्या भारतभूमीची ५ हजार वर्षांपेक्षा जुन्या काळातील प्राचीन आणि शास्त्रीय उपचार पद्धती आहे. ऋषी-मुनींनी तपश्चर्येतून निसर्गातील औषधी वनस्पतींचा शोध घेऊन ‘शरीर, मन आणि आत्मा’ यांचा समतोल राखणारी ही पद्धती जगाला दिली. ‘आयु’ म्हणजे जीवन आणि ’वेद’ म्हणजे ज्ञान. कोणतीही शस्त्रक्रिया न करता, दुष्परिणाम नसलेला आणि परवडणारा उपचार यामुळेच आयुर्वेद ही आपल्या हिंदू संस्कृतीची खरी ओळख आहे. आजच्या महागड्या वैद्यकीय युगातही आयुर्वेदाने अनेकांना जीवनदान दिल्याची उदाहरणे आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे हिंगणघाटच्या दिवाकर वाघमारे यांची. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या हिंगणघाटच्या एका कष्टकरी कुटुंबाला आयुर्वेदानेच नवा जन्म दिला.
 
 
diwakar waghmare
 
 
संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथील रहिवासी दिवाकर बाळकृष्णा वाघमारे (४५) हे कलोडे चौकात पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. १ वर्षापूर्वी त्यांना गंभीर यकृताचा आजार जडला. हिंगणघाट आणि नागपूरमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार झाले, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. डॉटरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, तो खर्च लाखो रुपयांच्या घरात होता. हातात पैसे नव्हते आणि आशा मावळत चालली होती. याच वेळी त्यांना एक देवदूतासारखी व्यती भेटली. तिने त्यांना गुजरातमधील नडियाद येथील पी. डी. पटेल आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे नाममात्र शुल्कात उपचार होत असल्याची माहिती दिली.
पत्नी रेखा वाघमारे यांनी सर्व धीर एकवटून ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दिवाकर यांना घेऊन गुजरात गाठले. तेथे २ महिने सलग आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान दिवाकर यांचे अन्न-पाणी पूर्णपणे बंद करून केवळ दूध आणि विशिष्ट आयुर्वेदिक जडी-बुटी दिल्या गेल्या. आज दिवाकर पूर्णपणे बरे झाले आहेत. नोव्हेंबर २०२५ पासून गेल्या ९ महिन्यांपासून ते आजही अन्न आणि पाणी घेत नाहीत. केवळ दूध आणि आयुर्वेदिक औषधांवर ते सामान्य जीवन जगत आहेत. एकेकाळी अंथरुणाला खिळलेला दिवाकर आज स्वतःच्या पायावर उभा आहे.diwakar waghmare दिवाकर यांच्या पत्नी रेखा सांगतात की, पैसे नसल्यामुळे आम्ही हताश झालो होतो. पण, आयुर्वेदाने आम्हाला नवा जन्म दिला. ज्या रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही, त्यांनी एकदा पी. डी. पटेल आयुर्वेदिक हॉस्पिटल, नडियाद, जि. खेडा, गुजरात येथे नकी भेट द्यावी, असेही त्या म्हणाल्या.