युक्रेनवर टाकला तीन टन वजनी बॉम्ब

रशियाच्या हल्ल्याात जापोरिज्जिया प्रांत बेचिराख; सैन्य तळ-हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
कीव्ह,
three tonne bomb dropped on ukraine अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष पुन्हा उफाळून आला असताना रशिया-युक्रेन युद्ध शिगेला पोहोचले आहे. युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत रशियाने सोमवारी रात्री जापोरिज्जिया क्षेत्रात एफएबी -३००० ग्लाईड बॉम्ब टाकला आहे. तीन टनाच्या बॉम्बने संपूर्ण परिसर बेचिराख झाला आहे. या भागातील सैन्याचे तळ, हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाले असून, मोठी जीवितहानी झाली. अद्याप मृत आणि जखमींची आकडेवारी समोर आली नाही.
 
 
three tonne bomb dropped on ukraine
 
३ टन वजन असलेल्या एफएबी-३००० ग्लाईड बॉम्बमध्ये १.४ टनाचे स्फोटके होती. या हल्ल्यात ओरिखोवे शहर, डोनेत्स्कच्या शचुरोवो भागात मोठे नुकसान झाले. तेल शुद्धीकरण प्रकल्पावर केलेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी युक्रेनवर पूर्ण ताकदीने हल्ले केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे. रशियन एरोस्पेस फोर्सेसने (व्हीकेएस) या बॉम्बचा वापर युक्रेनची लष्करी ठिकाणे नष्ट करण्यासाठी केला. शचुरोवो आणि ओरिखावे या सारख्या भागात युक्रेनचे लष्करी तळ आहेत. तिथे दारू गोळा डेपो आणि कमांड सेंटर्स असून, त्यावर अचूक हल्ले करण्यात यश आले. युक्रेनची लष्करी क्षमता कमकुवत करणे हल्ल्याचा उद्देश होता. दुसरीकडे युक्रेनच्या संरक्षण विभागाने हल्ल्याची पुष्टी करताना म्हटले की रशियाच्या वायुदलाने निवासी भागात बॉम्ब हल्ले चढवले. यात सैन्य तळ आणि हवाई संरक्षण प्रणालीचे नुकसान झाले. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून ढिगाऱ्यात नागरिकांचा शोध सुरू आहे.
  
युरोपियन देशांना मागितली मदत
हा बॉम्ब इतका शक्तिशाली आहे की तो आसपासच्या शेकडो किलोमीटरचा विनाश करू शकतो. रशियाजवळ एफएबी-५००, एफएबी-१५००, एफएबी-३००० सारखे ग्लाईड बॉम्ब आहेत. याचा मोठा साठा त्यांच्याकडे आहे. युक्रेनकडे या शक्तिशाली बॉम्बला प्रत्युत्तर देण्यासाठी उपयुक्त हवाई संरक्षण प्रणाली नाही. त्यांना यासाठी पश्चिम देशांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. याचाच रशिया फायदा उचलत आहे. अशातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांनी हल्ल्याची निषेध करताना युरोपियन देशांकडे हवाई संरक्षण प्रणाली आणि शस्त्रसाठ्याची मागणी केली आहे.
६५ नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी
रशिया सध्या जोनेत्स्क, खार्किव आणि जापोरिज्जिया भागात आक्रमक हल्ला करत आहे. यामुळे युक्रेन सैनिकांना दारू गोळ्याची कमतरता, लष्करी कमतरता या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. पश्चिमी देश युक्रेनला मदत करत असले तरी युक्रेनसाठी हे युद्ध थकवणारे झाले आहे. गेल्या आठवड्यात रशियाने केलेल्या हल्ल्यात ६५ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी आहेत.