न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावेच लागेल

शेख हसीनांच्या टिप्पणीवर बांगलादेश सरकारची स्पष्टोक्ती

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
ढाका,
sheikh hasinas remarks बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. त्यांना देशात परतताच न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. हसीना यांनी परतताना जगातील सर्वोत्तम वकील आपल्यासोबत घेऊन यावे. कारण, मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या दोषीच्या रूपात त्यांना कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागेल. त्यांना मृत्यूदंड देण्यात यावा, अशी देशातील नागरिकांची असल्याचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे सल्लागार झाहिद उर रहमान यांनी म्हटले आहे.
 
sheikh hasinas remarks
हसीना यांच्या निर्णयाचे स्वागत करताना रहमान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही हसीना यांच्या घोषणेचे स्वागत करतो. कारण आम्हाला न्याय सुनिश्चित करायचा आहे. देशातील जनतेची इच्छा आहे की, हसीना यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली जावी. जनतेची हीच मागणी लक्षात घेता, त्यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद न्यायालयाची संपूर्ण कार्यवाही अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालवली जाईल, ज्यावर आंतरराष्ट्रीय निरीक्षक लक्ष ठेवू शकतील आणि याचे थेट प्रक्षेपणही केले जाईल. न्यायालय हसीना यांच्याविरोधातील निर्णयावर पुनर्विचार करू शकते किंवा त्यांना निर्दोष मुक्तही करू शकते, अशी शक्यताही रहमान यांनी व्यक्त केली.
सरकार कोणत्याही दबावाखाली नाही
हसीना यांच्या प्रस्तावित वापसीमुळे सरकार कोणत्याही दबावाखाली नाही. यापूर्वी २०१० मध्ये अवामी लीगच्या कार्यकाळात स्थापन झालेल्या लवाद न्यायालयाच्या निर्णयांना स्थगिती देण्याचे किंवा ते रद्द करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. प्रक्रियात्मक मुद्दे हसीना यांच्या वापसीमध्ये अडथळा ठरणार नाहीत आणि भारत या प्रकरणी बांगलादेशशी चर्चा करून आवश्यक ती व्यवस्था करू शकतो, असे रहमान म्हणाले.
तर फाशी दिली जाईल.
देशातील लोकांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा कायम राहावी असे वाटते, आणि तसे झाल्यास, त्यांना फाशी दिली जाईल. कारण लोकांना तेच पाहायचे आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, या प्रकरणी आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. प्रत्यार्पणाचे हे प्रकरण कायदेशीर आहे आणि त्यानुसारच त्यावर कारवाई केली जाईल.