स्मार्ट मिटर सक्ती रद्द करा

आपचे जिल्हाधिकाèयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
smart-meter-scheme : आम आदमी पार्टी, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने स्मार्ट मीटर सक्तीचा निर्णय तत्काळ रद्द करावा तसेच पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
 
 

y15July-Smart-Meter 
 
 
 
निवेदनात, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या तीव्र विरोधामुळे स्मार्ट मीटरच्या सक्तीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा स्मार्ट मीटरची सक्ती सुरू करण्यात आली असून वीजदरातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे.
 
 
आम आदमी पार्टीने शासनाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटर सक्तीला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवून निवडणुकीनंतर जारी करण्यात आलेला सक्तीचा आदेश तत्काळ रद्द करावा. तसेच वाढती महागाई लक्षात घेऊन पंजाबमधील सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
 
 
यावेळी वसंत ढोके, मोबीन शेख, प्रशांत देवकते, विलास वाडे, अविनाश धनेवार, अ‍ॅड. मनीष माहुलकर, धनपाल नाईक, आकाश चमेडीया, शुभम चांदेकर, निलेश नांदूरकर, प्रतीक्षा रहांगडाले, भारती पिसाळकर, उषा श्रीरामे, विनोद रोकडे व अन्य उपस्थित होते.