बनावट व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणे विक्री प्रकरण

‘बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स’ कंपनीवर गुन्हा दाखल

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sale-of-spurious-soybean-seeds : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकèयांना निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रा. लिमिटेड गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना या कंपनीविरुद्ध बाभूळगाव पोलिस ठाण्यात 14 जुलै रोजी रात्री विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समिती बाभूळगाव येथील बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी दत्तात्रय विठ्ठल तमलवाड यांनी या प्रकरणी रीतसर कायदेशीर तक्रार नोंदवली आहे.
 
 
jlk
 
 
 
जिल्ह्यातील अनेक शेतकèयांनी त्यांच्या शेतात पेरणीसाठी बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. परंतु, पेरणीनंतर बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी शेतकèयांकडून प्राप्त झाल्या. शेतकèयांच्या तक्रारीनुसार, कंपनीने बियाण्यांच्या बॅगवर ‘उत्तम दर्जा, 100 टक्के समाधान’ असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीत बियाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले.
 
 
बियाणे निरीक्षकांनी नियमानुसार या बियाण्यांचे नमुने काढून ते तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात हे बियाणे ‘अप्रमाणित’ असल्याचे निष्पन्न झाले. कंपनीने बियाण्याची उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग व सिलिंग या बाबींवर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे प्रमाणीकरण न घेता, बियाणे प्रमाणित असल्याचे भासवून शेतकèयांची दिशाभूल व फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
 
 
या फसवणुकीप्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी संबंधीत कंपनीविरुद्ध भान्यासं 318(4), अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955: कलम 3, बीज अधिनियम, 1966: कलम 6(र), 7(ल), 19 व 21 बियाणे नियम, 1968: नियम 10 नुसार गुन्हा नोंद केला आहे. बाभूळगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रोहित बेंद्रे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील एकाही शेतकèयाची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. खरीप हंगामात शेतकèयांचे आर्थिक गणित बियाणांवर अवलंबून असते. बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स कंपनीवर झालेली ही कारवाई इतर अप्रमाणित बियाणे कंपन्यांसाठी कडक इशारा आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खते व बियाणे विक्रीवर आपले भरारी पथक तैनात ठेवले असून, कुठेही गैरप्रकार आढळल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-विकास मीना
जिल्हाधिकारी, यवतमाळ