तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
substandard-seeds : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तर कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक मंगळवारी महसूल भवनात झाली. बैठकीत शेतकèयांच्या तक्रारी गांभीर्याने घेत ज्या बियाणे कंपन्यांविरुद्ध उगवणीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या कंपन्यांना जबाबदार धरून सर्व तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाèयांनी दिले.
जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीन बियाणे उगवणीच्या एकूण 832 तक्रारी प्राप्त झाल्या असून, नेर, बाभुळगाव व दारव्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 415 तक्रारी नेर तालुक्यात नोंदविण्यात आल्या असून, त्यानंतर बाभुळगावमध्ये 156 व दारव्हा तालुक्यात 136 तक्रारी प्राप्त झाल्या. कळंबमध्ये 50, वणीमध्ये 19, यवतमाळात 13, पुसद 11, आर्णी 9, घाटंजी व मारेगावात प्रत्येकी 5, दिग्रस 4, पांढरकवडा 4, उमरखेड 3, महागावमध्ये 2 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
त्यापैकी 485 तक्रारींची तालुका तक्रार निवारण समितीने पाहणी पूर्ण केली आहे. 302 तक्रारीची पाहणी करण्यात येणार आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने तातडीने घेऊन त्यांचे अहवाल वेळेत प्राप्त करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. नमुने अप्रमाणित आढळल्यास संबंधित कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन प्रकरणे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.
जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू असून, 14 जुलैपर्यंत 4 हजार 90 कृषी निविष्ठा दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले असून 38 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. 8 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विकास अधिकारी लहू आडे, मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी धीरज मोहेकर, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कृषी विक्रेते व विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.