मालेगाव,
samruddhi mahamarg समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडोरमध्ये तालुक्यातील कोळगाव गावाजवळ चॅनल क्रमांक २५२/९०० येथे मंगळवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजता दरम्यान झालेल्या भिषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच ३० बीडी ६३७८ चे चालक रोशन मडावी (वय २७) राहणार किन्ही पवार, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला हे मेहकर वरून कारंजाकडे जात होते. त्यावेळी मागुन येणार्या टोयोटा अर्बन क्रुझर कार क्रमांक एमएच १२ युजे २६०८ या कारचे चालक सुरेंद्र गोवर्धन खोटरे (वय ५६) राहणार गौरक्षण रोड, अकोला यांनी पिकअपला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक सुरेंद्र खोटरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप मधील चालक रोशन मडावी तसेच यश कैलास वानखडे आणि कुलदीप बबनराव वानखडे सर्व राहणार किन्ही पवार हे सुखरूप असून, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक अमानी अंतर्गत समृद्धी महामार्ग उपकेंद्र मालेगाव येथील हेड कॉन्स्टेबल अमोल इंगोले, कॉन्स्टेबल गोपीचंद ठाकरे तसेच एमएसएफ जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृत सुरेंद्र खोटरे यांना रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथे हलविण्यात आले. दरम्यान अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून योग्य प्रकारे बॅरिकेटिंग करण्यात आले. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.