सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र मोहिमेत एफडीएची धडक कारवाई

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
पुणे,
safe food safe drug safe maharashtra नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राबविलेल्या सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या विशेष मोहिमेत पुणे विभागात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भेसळीच्या संशयावरून पुणे विभागातील सात ठिकाणी छापे टाकून तब्बल ३७ लाख ६१ हजार १०० रुपये किमतीचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला.दिनांक ८ ते १२ जुलै या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ९२ हजार ५४१ किलो विविध अन्नपदार्थांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये दूध, पनीर, लस्सी तसेच विविध प्रकारच्या कुकीजमध्ये भेसळ व लेबलिंगमधील त्रुटी आढळून आल्या.
 

fda seizes food stock worth rs 37 lakh in safe food safe drug safe maharashtra drive 
पुणे जिल्ह्यात मे. अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज, सांगोला (जि. सोलापूर) यांच्या दूध वाहतूक टँकरमधून नमुने घेण्यात आले. भेसळीच्या संशयावरून २८ हजार ४९८ लिटर दूध, किंमत ११ लाख ३९ हजार ९२० रुपये, जप्त करण्यात आले. दूध नाशवंत असल्याने ते नष्ट करण्यात आले.तसेच मे. प्रियदर्शनी दूध संकलन केंद्र, आंबीलवाडी (जि. अहिल्यानगर) यांच्या टँकरमधून नमुने घेऊन २४ हजार ४९८ लिटर दूध, किंमत ९ लाख ७९ हजार ९२० रुपये, जप्त करण्यात आले. संशयित असल्याने हा साठाही नष्ट करण्यात आला.
जुन्नर येथील यशोदा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या संस्थेची तपासणी करताना ए-२ गिर गाय दूध आणि गायीच्या दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय आल्याने १ हजार ८०६ लिटर दूध, किंमत ८१ हजार २७० रुपये, जप्त करण्यात आले. संबंधित संस्थेला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजच्या चिलिंग सेंटरवरही एफडीएने छापा टाकला. या कारवाईत ३७ हजार ५३२ लिटर दूध जप्त करण्यात आले. या दुधाची किंमत १५ लाख १ हजार २८० रुपये असून, संस्थेकडे वैध परवाना नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका गोठ्यावर टाकलेल्या छाप्यात दूध भेसळीसाठी व्हे परमिट पावडर, स्प्रे ड्राईड पावडर आणि इन्स्टंट टी-कॉफी क्रिमर यांचा वापर होत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
भेसळखोरांवर कठोर कारवाई सुरूच राहणार
पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन, पुणेचे सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी सांगितले की, विनापरवाना व्यवसाय करणारे तसेच नागरिकांच्या आरोग्याशी safe food safe drug safe maharashtra  खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी एफडीएच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.