काश्मिरींचे आता ‘वतन या कफन’

व्याप्त काश्मिरातील जनतेची पाकिस्तानविरोधात आरपारच्या लढाई

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
इस्लामाबाद, 
watan-ya-kafan : व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात जाेरदार आंदाेलन करण्यात येत आहे. दरम्यान, जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीचे (जेएएसी) नेते सरदार अमन काश्मिरी यांनी एका जाहीर सभेत स्वतंत्र मातृभूमीच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. मुझफ्फराबादकडे नियोजित मोर्चाच्या आधी समर्थकांना संबोधित करताना ते म्हणाले, काेणत्याही परिस्थितीत हे आंदोलन सुरूच राहील.
 
 
bgjh
 
जेएएसी नेते पुढे म्हणाले, आम्हाला आमचा स्वतःचा देश हवा आहे. प्रत्येकाला स्वतःची मातृभूमी, स्वतःचे हक्क आणि स्वतःचे सरकार असण्याचा अधिकार आहे. तसेच आम्हालाही आमचे हक्क हवे आहे़ आंदोलनातील सदस्यांना धमक्या मिळत आहेत़ त्यांना बक्षिसांचे आमिषही दाखवण्यात येत आहे़ ते आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत़ आमच्यावर बक्षीस जाहीर झाले आहे़ ते आम्हाला सोडणार नाहीत. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून इथे आलो आहोत, असा दावाही त्यांनी केला.
 
 
’करा किंवा मरा’ लढ्याची घोषणा
 
 
वृत्तानुसार, आंदोलनाच्या समर्थकांचा उल्लेख करत अमन काश्मिरी म्हणाले, या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. आम्हाला माता, मुले आणि आमच्या भावी पिढ्यांचा आशीर्वाद आहे. हा आमचा संघर्ष आहे. त्यांनी व्याप्त काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्यांवर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले़ आमच्यासंदर्भात ते म्हणतात, संघर्ष करणे तुमच्या नशीबात नाही, तुम्ही खुशामतच करत रहा, असा आराेपही त्यांनी केला़ तसेच स्थानिक नेत्यांचे पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेशी संगनमत आहे, असा दावाही त्यांनी केला़
 
स्थानिक नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
 
व्याप्त काश्मीरमध्ये जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीच्या नेतृत्वात तेथील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत़ मुझफ्फराबाद व रावळकोटसारख्या प्रमुख शहरांमध्ये हिंसक चकमकी होत आहेत. या आंदोलनामागे व्याप्त काश्मीर विधानसभेत निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ जागा हे महत्वाचे कारण आहे. या जागा अशा लोकांसाठी राखीव आहेत, जे दशकांपूर्वी भारतीय-प्रशासित काश्मीरमधून स्थलांतरित होऊन पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंधसारख्या इतर भागांमध्ये स्थायिक झालेत. या १२ जागांच्या माध्यमातून पाकिस्तानी सरकार व्याप्त काश्मीरच्या राजकारण आणि प्रशासनात थेट हस्तक्षेप करून स्थानिक नागरिकांचा राजकीय आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आराेपही त्यांनी केला़