वर्षभरात हिंगणघाट आगाराला तब्बल ३५ नवीन बसेस

आ. कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश *१० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट,
hinganghat depo new buses सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात हिंगणघाट आगाराला तब्बल ३५ नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहे. या नव्या ताफ्यातील १० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण बुधवारी आ. कुणावार यांच्या हस्ते पार पडले.
 
 
hinganghat depo new buses
 
 
हिंगणघाट आगारातील वाढती प्रवासी संख्या, जुन्या बसेसमुळे निर्माण होणार्या अडचणी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आ. कुणावार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केला. मुंबई येथे झालेल्या बैठकीत आगारासाठी नवीन बसेसची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत १५ नवीन राजमाता जिजाऊ बसेस हिंगणघाट आगारासाठी मंजूर झाल्या. यापूर्वी पहिल्या ५ बसेसचे लोकार्पण करण्यात आले होते. आज उर्वरित १० अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.
सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि अधिक आरामदायी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बसेसमुळे प्रवाशांना सुरक्षित, सुखकर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेषतः शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लालपरी ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आधुनिक बसेसची ही भर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी देणारी ठरणार आहे.
यावेळी संवाद साधताना आ. कुणावार म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी, यासाठी सतत पाठपुरावा करू. धार्मिक व पर्यटनस्थळांसाठी विशेष बस सेवाही सुरू करण्यात आली आहे.hinganghat depo new buses हिंगणघाट-पंढरपूर-तुळजापूर, हिंगणघाट-समुद्रपूर-नागपूर तसेच हिंगणघाट-चिखलदरा या नवीन मार्गांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही आ. कुणावार यावेळी म्हणाले.
या लोकार्पण सोहळ्यास उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे, बांधकाम सभापती वामन मावळे, वामन खोडे, पोलिस निरीक्षक अनिल राऊत, गटनेते तथा नगरसेवक भूषण पिसे, नगरसेवक अनिता मावळे, वर्धा विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, यंत्र अभियंता प्रतापसिंग राठोड, सुरेश गायकवाड, डेपो मॅनेजर संदीप पिसे, आदींची उपस्थिती होती.