गोंदियातील कोचिंग क्लासवर आयकर व जीएसटी विभागाची धाड

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
coaching-class-in-gondia : गोंदिया शहरातील मामा चौक परिसरातील कॅरीयर झोन या कोचिंग क्लासवर नागपूर येथील आयकर व जीएसटी विभागाने बुधवारी १५ जुलै रोजी धाड घालून कारवाई केली. कारवाईदरम्यान कागदपत्रांची तपासणी सुरू करीत कोचिंग क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
 
 
 
jk
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार जीएसटी (GST) नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींनंतर सदर कोचिंग क्लासवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोचिंग शुल्कावर १८% जीएसटी न भरणे, ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ (ITC) मध्ये फेरफार करणे आणि रोख स्वरूपातील उत्पन्न लपवणे या बाबींचा समावेश आहे. शालेय शिक्षण किंवा पदवी मिळवून देणारे उच्च शिक्षण यांसारख्या औपचारिक शिक्षणाला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. मात्र, व्यावसायिक श्रेणीत येणाऱ्या सेवांवर विशेषतः खाजगी शिकवणी (परीक्षा तयारीसाठीच्या सेवा), व्यावसायिक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि ई-लर्निंग (ऑनलाइन कोर्सेस व डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म्स)वर१८% कर लागू होतो. जेईई (JEE) आणि नीट (NEET) यांसारख्या व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षांसाठीचे कोचिंग याच १८% जीएसटीच्या कक्षेत येतात. मात्र सदर संस्था चालकांकडून या सर्व बाबींचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.