बुलढाणा,
leopard-on-the-rampage : तालुक्यातील गिरडा गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका शेतकर्याच्या गोठ्यात घुसून बिबट्धाने तब्बल चार शेळ्या, एक बोकड आणि एका मोठ्या वासराचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना दि. १४ जुलै मध्यरात्री घडली.

आठ दिवसांपूर्वी याच परिसरात सहा बकर्यांवर बिबट्याने हल्ला करून मोठे नुकसान केले होते. वारंवार घडणार्या या घटनांमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरडा गावातील शेतकरी नरेंद्र नामदेव पंडित यांच्या घरालगत जना वरांचा गोठा आहे. मंगळवारी रात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट गावात प्रवेश करत गोठ्यावर हल्ला चढविला. काही क्षणांतच गोठधातील चार शेळ्या, एक बोकड आणि एक मोठे वासरू यांना ठार केले. पहाटे जनावरांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना हा प्रकार निदर्शनास आला. गोठधात सर्वत्र रक्ताचे डाग, मृत जनावरे आणि बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. गावाच्या अगदी मध्यभागी बिबट्याने इतया सहजपणे प्रवेश करून जनावरांची शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणे, नियमित गस्त वाढविणे आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा मोठी घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावालगत असलेल्या रायमुनिया परिसरातील दाट झाडी आणि झुडपे ही हिंसा प्राण्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. या झाडीमुळे बिबट्याला गावात प्रवेश करून पुन्हा जंगलात पसार होणे सहज शय होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील झाडीची तातडीने साफसफाई करावी, गावालगत संरक्षक जाळी उभारावी आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड, सरपंच सुनिता गायकवाड, योगेश गायकवाड, अशोक गायकवाड, रविंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर पोफळे, शुभम शेळके यांच्यासह गिरडा येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे लेखी निवेदन सादर केले आहे. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असून, तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.