मुंबई
shraddha-walkar-murder-case देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही श्रद्धाला न्याय मिळालेला नाही. आरोपी आफताब पूनावालाला अद्याप कठोर शिक्षा झालेली नसल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अफताफ हा सध्या तुरुंगात राहून एमएचे शिक्षण घेत आहे. तो कधी परीक्षेचं कारण, कधी दातांवरील उपचार, तर कधी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची कारणं सांगत आहे. अशा विविध कारणांमुळे आरोपीला वारंवार सवलती मिळत असल्याचा आरोप होत असून त्यामुळे खटल्याची सुनावणी मुद्दाम लांबवली जात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
shraddha-walkar-murder-case श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब पूनावालावर खटला सुरू आहे. मात्र, तब्बल 215 हून अधिक सुनावण्या होऊनही पुरावे सादर करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आरोपीकडून वेगवेगळी कारणे देत सुनावणी टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप श्रद्धाच्या नातेवाईकांनी केला आहे.
shraddha-walkar-murder-case आता 20 जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी पार पडणार होती. मात्र याच दिवशी अफताफची परीक्षा आहे. एमए सोशिओलॉजीचा त्याचा शेवटचा पेपर आहे. त्याने कोर्टात अपील केलं होतं की, तो इंदिरा गांधी राष्ट—ीय मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत आहे. 20 जुलैला त्याचा एमए सोशिओलॉजीचा शेवटचा पेपर आहे. तिहार तुरुंगात दुपारी 2 ते 5 दरम्यान हा पेपर होणार आहे. याच वेळी ही सुनावणी असल्याने सुनावणीची तारीख पुढे ढकलावी, अशी विनंती त्याने कोर्टाला केली. यानंतर कोर्टाने त्यांच्या अर्जाला मंजूरी देत सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. यामुळे आता श्रद्धाच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
shraddha-walkar-murder-case दरम्यान, न्यायाची प्रतीक्षा करत असतानाच श्रद्धाचे वडील आणि आजी यांचे निधन झाले. पुरावा म्हणून जतन केलेले श्रद्धाचे अवशेषही अद्याप कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलेले नसल्याने तिच्यावर अंत्यसंस्कारही होऊ शकलेले नाहीत. श्रद्धाची आत्या राजल नाईक यांनी न्यायव्यवस्थेकडे खटला जलदगतीने पूर्ण करण्याची आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. चार वर्षांनंतरही न्याय न मिळाल्याने श्रद्धाच्या कुटुंबीयांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.