अमरावतीतल्या दोन टोळींवर मोक्का कारवाई

पोलिस आयुक्तांनी घेतला निर्णय

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
mcoca-action : गुन्हेगारी कारवाईंमध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्या दोन टोळींविरोधात पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशावरून आज मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस ठाणे नागपुरी गेट येथे दाखल गुन्हयातील आरोपी टोळी प्रमुख शेख मुन्नु शेख सलीम व त्याच्या टोळीचे सदस्य मोहम्मद सोफियान उर्फ गोलु मोहम्मद मन्नान, अरबाज खान अहेफाज खान, सैयद तौसीब सैयद नासीर, सुफियान बेग, वसीम खॉ, शेख परवेज, मो. सलमान, सै. अल्तमष, मो. सोहेल, रहेमतउल्ला फईमउल्ला, साहिल खान, शेख रेहान, सैय्यद शोएब, गोलु, अकिल, शेख अलीम, समीर जिलांनी सर्व रा.अमरावती यांचेविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख व सदस्यांवर सन २०१९ ते २०२६ या दरम्यानचे एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुखावर तर यापूर्वी एम.पी.डी.ए. कायद्याअन्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
 
 
 
mcoca-action
 
 
 
दुसरी टोळी राजापेठ हद्दीतील आहे. टोळी प्रमुख यश सुनील कडू व टोळीतील सदस्य जय दिगंबर चौधरी, रोहित दिपकराव धवस, राम अनिल जाधव, धनराज सुधीर घोंगळे, प्रेम किशोर बगाडे, जय सुनील कडू, विरेंद्र चौधरी, साहिल गव्हाळे, आदित्य देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर टोळीतील सदस्यांवर २०१८ ते २०२६ दरम्यान एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख यश कडू याचेविरूध्द यापूर्वी देखील एम.पी.डी.ए. कायदयाअन्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून ही कारवाई केली आहे. पाच वर्षात पहिल्यांदा अशी कारवाई झाली आहे. या कारवाईने गुन्हेगारी घटनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.