मोतसांवगा धरणात केवळ ६.७५ टक्के पाणीसाठा

१२ दिवसांत दीड टक्कयाने घट

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
मंगरुळनाथ,
motsawanga तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. गेल्या १२ दिवसात मोतसावंगा धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात १.५३ टक्के झाली आहे. भर पावसाळ्यात या प्रकल्पाच्या पातळीत घट होत असल्याने पुढे शहरात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वाढली आहे.
 

motsawanga  
मोतसावंगान धरणाची ३० जून रोजी जलपातळी ४८५.४० मीटर होती. त्यावेळी उपयुक्त पाणीसाठा ०.३८ दशलक्ष घनमीटर (८.३८ टक्के) इतका होता. १२ जुलैपर्यंत जलपातळी ४८५८.२० मीटर झाली असून, उपयुक्त पाणीसाठा ०.३१ दशलक्ष घनमीटर (६.७५ टक्के) इतका झाला आहे. म्हणजेच १२ दिवसात उपयुक्त पाणीसाठ्यात ०.०७ दशलक्ष घनमीटरने (१.५३ टक्के) घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. धरणाच्या पाणलोट परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. याचा परिणाम खरीप हंगामावरही होत असून, अनेक ठिकाणी उगवणीनंतर पावसाने उघाड दिल्याने दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली आहे. मोतसावंगा धरणावर मंगरुळनाथ शहरासह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्थेची मोठी भिस्त असल्याने प्रकल्पातील घट चिंतेची बाब ठरत आहे. त्यातच वेधशाळेने पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मोतसावंगा धरणाच्या पातळीत अधिकच घट होण्याची शक्यता आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करा
मोतसावंगा प्रकल्पातील जलसाठा motsawanga अत्यल्प पातळीवर आल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता लक्षात घेता नगरसेवक नंदलाल पवार यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.. पवार म्हणाले की, उपलब्ध जलसाठा मर्यादित असल्याने प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज आहे. नळ विनाकारण सुरू ठेवणे अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. प्रत्येकाने पाणी बचतीची सवय अंगीकारने गरजेचे आहे, असे आवाहन नगरसेवक नंदलाल पवार यांनी केले.
छायाचित्र - मोतसावंगा धरणास आलेले डबक्याचे स्वरुप