अत्याचार करून अल्पवयीन मुलीचा खून

*रोठा परिसरातील घटना *नग्नावस्थेत आढळला मृतदेह

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
वर्धा,
murder-sexual-assault :  नजिकच्या रोठा तलाव परिसरात अवघ्या बारा वर्षीय मुलीचा झोपडीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने संबंधीत मुलीवर अत्याचार केल्यावर तिचा खून करण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही घटना आज बुधवारी सायंकाळी उघडकीस आली असून अधिकची माहिती सध्या सावंगी पोलिस घेत आहेत.
 
 
 
jk
 
 
 
पोलिस सुत्रानुसार, वर्धा येथील रहिवासी कावळे यांच्या मालकीचे रोठा तलाव परिसरात शेत आहे. याच शेतातील झोपडीत या प्रकरणातील पीडितेचा परिवार राहतो. मृतक व तिच्या दोन बहिणी गावातीलच शाळेत शिक्षण घेतात. बुधवारी नेहमीप्रमाणे मृतक व तिच्या दोन्ही बहिणी शाळेत गेल्या. मृतकचे आई-वडील काही कामानिमित्त वर्धा येथे आले होते. अशातच मृतक ही दुपारी शाळेतून लवकर घरी परतली. ती घरी एकटी असताना या प्रकरणातील आरोपीने मृतकाच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कुणालाही या घटनेची पडू नये म्हणून तिची दगडाने ठेचून खुन केली. कुटुंबिय घरी परतल्यावर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आणि नग्नावस्थेत दिसला. शिवाय डोक्यावर गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सावंगी पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली. मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.