‘ती’ आज वेळेवर आली अन् विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!

निखिल कडू यांच्या मागणीची दखल

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
आर्वी, 
Nikhil Kadu's demand acknowledged आर्वी ते सर्कसपूर दरम्यान धावणारी बस आज वेळेवर गावात दाखल झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून वेळेअभावी शैक्षणिक नुकसानीला सामोरे जाणार्या शाळकरी विद्याथ्र्यांची मोठी अडचण दूर झाली. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला बसच्या वेळापत्रकात काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आला होता. त्यामुळे १० वाजताची बस उशिराने धावत असल्याने शाळा वेळेत गाठणे विद्याथ्र्यांना कठीण झाले होते. या समस्येकडे सामाजिक कार्यकर्ते निखिल कडू यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून लक्ष वेधले होते. अखेर आगार व्यवस्थापनाने या मागणीची तातडीने दखल घेत वेळापत्रकात सुधारणा केल्याने विद्याथ्र्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्कसपूर आणि टोणा येथील जवळपास ५० विद्यार्थी शिक्षणासाठी याच बससेवेवर अवलंबून आहेत.
 
 
se4456
 
 
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सकाळी सुटणारी बस योग्यवेळी पोहोचत असल्याने विद्याथ्र्यांचा प्रवास सुकर होत होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात या बसफेरीला लाडेगावचा अतिरिक्त फेरा जोडण्यात आल्यामुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले होते आणि बस थेट दुपारी १२ नंतर पोहोचत होती. ही समस्या निखिल कडू यांनी बसस्थानक व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या मार्गावरील प्रवाशांची व विद्याथ्र्यांची वास्तविक संख्या आणि शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पूर्वीची स्वतंत्र व्यवस्था अधिक योग्य ठरेल, अशी विनंती केली होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून बसस्थानक व्यवस्थापन व नियंत्रकांनी निखिल कडू यांनी मांडलेली बाजू तपासून लाडेगावचा अतिरिक्त फेरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता पूर्ववत जुन्या व सुकर वेळापत्रकानुसार सकाळी १० वाजता आर्वीहून सुटणारी बस थेट १०.३० वाजता सर्कसपूर येथे योग्य वेळेत पोहोचवली. बस वेळेत गावात आल्याचे पाहून ग्रामस्थांसह विद्याथ्र्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला. प्रशासनाने जनभावना आणि विद्याथ्र्यांची गैरसोय समजून घेऊन त्वरित सकारात्मक पाऊल उचलले. एसटी महामंडळाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे विद्याथ्र्यांची दररोजची पायपीट आणि पालकांची काळजी मिटली असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्कसपूर व टोणा येथील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.