पाटस रोटी घाटातून दिंडी मार्गस्थ

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
दौंड,
palkhi वरवंड (ता. दौंड) येथील मुक्कामानंतर वरवंडकरांचा पाहुणचार घेत पालखी सोहळा भागवत वस्ती येथे आला, या ठिकाणी भागवत परिवाराच्यावतीने वारकऱ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
 
 
palkhi procession passes through patas roti ghat after grand welcome in daund
 
यावेळी वरसगाव पानशेत धरणग्रस्त दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष पंढरीनाथ पासलकर यांनी पालखी सोहळ्यातील विनेणेरांचे स्वागत केले. साधारणत येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर पालखी सोहळा विसाव्यासाठी होत्या. दुपारी बारा वाजता पालखी पाटस् रोटी घाटाच्या पायथ्याशी आली. त्यानंतर चढतीचा आणि वळणदार घाट पालखी सोहळ्याने दोन तासात पार केला. रोटी गावच्या शीवेवर पालखीची आरती करण्यात आली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी ऊभारण्यात आल्या होत्या दरम्यान पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रोटी, वासुंदे येथील पाहुणचार घेत पालखी सोहळा रात्री बारामती तालुक्यातील उंडवडीत दाखल झाला.