प्रकाश गोकुळे यांची भाजपा दारव्हा शहराध्यक्षपदी निवड

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
दारव्हा,
prakash-gokule : भारतीय जनता पार्टीच्या दारव्हा शहर अध्यक्षपदी प्रकाश गोकुळे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या संघटन कौशल्याचा व जनसेवेच्या कार्याचा सन्मान करत ही जबाबदारी सोपवली. प्रकाश गोकुळे यांनी यापूर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून दारव्हा शहराचे प्रतिनिधित्व केले आहे. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी, पायाभूत सुविधांसाठी व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. निवडीनंतर बोलताना गोकुळे म्हणाले, पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. दारव्हा शहरातील प्रत्येक बूथ मजबूत करणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे व संघटन विस्तार करणे हे माझे प्रथम प्राधान्य असेल. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
 
y15July-Prakash-Gokule