श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात स्वागत

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
बारामती
sant tukaram maharaj palkhi 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली तुकाराम'....रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी... अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले.
 

sant tukaram maharaj palkhi welcomed in baramati with devotional atmosphere and warkari chants 
मौजे खराडेवाडी येथे प्रशासनाच्यावतीने उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले. यावेळी पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे खाजगी सचिव सचिन यादव, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, दौंडचे बापूराव तडस, बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, बारामतीचे गट विकास अधिकारी किशारे माने, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उंडवडी गवळ्याची व बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी आहे.