१६ वर्षे पूर्ण झालेले ऑटो स्क्रॅप करा; अन्यथा दंड

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
वर्धा,
scrapping-action : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात नोंदणी झालेल्या आणि १६ वर्षांची मुदत पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षांवर स्क्रॅपिंगची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात नोंदणीपासून १६ वर्षे पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा स्क्रॅप करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी केले आहे.
 
 
scrapping-action
 
 
७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत १६ वर्षांची मुदत पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा स्क्रॅप करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. शासनाच्या स्क्रॅप धोरणानुसार १६ वर्षे पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा रस्त्यावर चालविणे अयोग्य ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा धारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी तपासून मुदत पूर्ण झालेली वाहने तातडीने अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रामार्फत स्क्रॅप करावी. १६ वर्षांपेक्षा जुनी ऑटोरिक्षा रस्त्यावर चालविताना आढळल्यास संबंधित वाहनधारकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून वाहन जप्त करणे व नोंदणी रद्द करणे, अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला आहे.