शुभमनची कोहलीच्या खास क्लबमध्ये झाली एन्ट्री

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
बर्मिंगहॅम,
Shubman joins Kohli's exclusive club इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची भारताने विजयी सुरुवात करत एडजबॅस्टन स्टेडियमवर पहिल्या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवला. २५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४८ धावांवर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. मात्र, कर्णधार शुभमन गिलने संयमी आणि प्रभावी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आणि विजयाचा पाया रचला.गिलने ८० धावांची खेळी केली. दुखापतीमुळे त्याला निवृत्त व्हावे लागले, मात्र या खेळीदरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. परदेशात ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा विराट कोहलीनंतरचा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
 
 
34456
 
एजबॅस्टन मैदानावर केवळ तीन डावांत गिलने ५१० धावांचा टप्पा पार केला आहे. कर्णधार म्हणून या मैदानावर त्याने एक कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला असून, तीन डावांत तब्बल २५५ च्या सरासरीने ५१० धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील एका मैदानावर ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.याआधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर कर्णधार म्हणून आठ सामने खेळताना ६४.३७ च्या सरासरीने ५१५ धावा केल्या होत्या. आता गिलने ५१० धावांसह या विशेष यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.
 
 
परदेशातील एका मैदानावर कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडिजचे क्लाइव्ह लॉईड यांनी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ६२६ आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ६४९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ग्रॅम स्मिथ यांनी एजबॅस्टनवर ६१० धावा केल्या असून, विराट कोहली ५१५ आणि शुभमन गिल ५१० धावांसह या यादीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. २०२६ हे वर्षही शुभमन गिलसाठी शानदार ठरत आहे. यंदा त्याने सात एकदिवसीय सामन्यांपैकी सहा डावांत ११३.२५ च्या सरासरीने ४५३ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतके जमा झाली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कारकीर्दीतील फलंदाजीची सरासरीही ६० पर्यंत पोहोचली आहे.