पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांवर अकोल्यात राज्यस्तरीय मंथन

१९ जुलैला अकोला येथे पत्रकारांचे भव्य अधिवेशन

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
देऊळगाव राजा,
state level manthan in akola पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तसेच गुणवंत पत्रकारांच्या कार्याचा गौरव या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी अकोला येथे भव्य राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, चर्चासत्र व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी अकोला येथील हॉटेल कृष्णा इम्पेरियल (नवीन बसस्थानकाजवळ) येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणाऱ्या या एकदिवसीय अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार, संपादक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
 
 
state level manthan in akola
 
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी राहणार आहेत. यावेळी मा. न्याय. चंद्रलाल मेश्राम, खासदार अनुप धोत्रे, खासदार रणधीर सावरकर, डॉ. विश्वासराव आरोटे, नितीन देशमुख, आमदार हरीश पिंपळे, आमदार साजिद खान पठाण, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, प्रकाश तायडे, सेवकराम ताथोड, डॉ. संतोष हुसे, श्रीकृष्ण अंधारे, संदीपदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता "पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिस्तभंगाची कारवाई" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकल