शंभराव्या साहित्य संमेलनानिमित्त ९९ अध्यक्षीय भाषणांच्या अभ्यासाला सुरुवात

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
पुणे,
akhil bharatiya marathi sahitya sammelan अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शंभराव्या पर्वाच्या निमित्ताने मागील ९९ साहित्य संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून विश्लेषण करणारा संशोधन प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाला विद्यापीठाची मान्यता मिळाली असून, त्यावर आधारित विश्लेषणात्मक संशोधन ग्रंथ आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात येणार आहे.
 

akhil bharatiya marathi sahitya sammelan 
या प्रकल्पाच्या मार्गदर्शक मंडळाची बैठक मंगळवारी वृत्तपत्रविद्या विभागात झाली. बैठकीला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. अरुणा ढेरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश सोमण, कार्याध्यक्ष डॉ. स्वाती म्हाळंक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. आनंद काटीकर, इतिहास संशोधक प्रा. डॉ. गणेश राऊत तसेच प्रकल्पाच्या संपादक मंडळाचे सदस्य धनंजय कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. संजय तांबट आणि प्रा. योगेश बोराटे उपस्थित होते. या संशोधन प्रकल्पासाठी वृत्तपत्रविद्या विभागातील श्रीकांत कांबळे आणि विशाल पवार यांची संशोधन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.