स्वाती मेश्राम राळेगाव काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
swati-meshram : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटन विस्तार मोहिमेंतर्गत राळेगाव महिला शहराध्यक्षपदी स्वाती गजानन मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती काँग्रेसच्या महिला आघाडीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष वंदना आवारी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.
 
 
y15July-Swati-Meshram
 
स्वाती मेश्राम सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभागी आहेत. नियुक्तीनंतर बोलताना मेश्राम यांनी, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
 
 
या नियुक्तीचे श्रेय त्यांनी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल मानकर, जिल्हाध्यक्ष सचिन नाईक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, राळेगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे व शहराध्यक्ष प्रदीप ठुणे यांना दिले.
 
 
स्वाती मेश्राम यांच्या निवडीमुळे राळेगाव शहर व तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.