‘वर्षा’वर अर्धा तास बंदद्वार चर्चेने माजली खळबळ

फडणवीसांच्या भेटीला तटकरे, पाटील, पटेल

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
मुंबई
maharashtra politics महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी  काँग्रेसच्या दोन्ही गटांतील महत्त्वाचे नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’वर पोहोचल्याने विविध राजकीय तर्कांना उधाण आले आहे. या भेटीमुळे आगामी राजकीय घडामोडी, आघाड्यांचे संभाव्य बदल आणि नव्या समीकरणांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

politics 
 
maharashtra politics मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ‘वर्षा’वर गेले होते. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तेथे दाखल झाले. मुख्यमंत्री आणि या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
maharashtra politics या बैठकीचा अधिकृत अजेंडा किंवा चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नसला, तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट भविष्यात राष्ट्रीय  लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत जाणार का, याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर या बैठकीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
maharashtra politics दुसरीकडे, अजित पवार गटातही काही अंतर्गत घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या कोअर कार्यकारिणीतील बदलांनंतर काही नेत्यांबाबत विविध राजकीय चर्चा रंगल्या होत्या. अशा वातावरणात मुख्यमंत्री निवासस्थानी झालेली बैठक आणखी महत्त्वाची मानली जात आहे.
maharashtra politics दरम्यान, मंगळवारीच मुंबईमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील आमदारांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती, भविष्यातील राजकीय दिशा आणि संभाव्य आघाड्यांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. काही आमदारांनी भविष्यातील राजकीय पर्यायांबाबत आपली भूमिका मांडल्याचीही माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
 
maharashtra politics यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, अशी भूमिका जयंत पाटील यांनी बैठकीत मांडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत कोणत्याही नेत्याकडून अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या चर्चेत नेमके कोणते विषय होते, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेते का, याकडे राजकीय निरीक्षक आणि जनतेचे लक्ष लागले आहे.