पुलगाव,
pulgaon दरवर्षीप्रमाणे जि.प.च्या माजी अध्यक्ष वैशाली येरावार यांच्या वाढदिवसानिमित्त गुंजखेडा येथे शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.गुंजखेडा येथे १२ जुलै वैशाली येरावार यांचा जन्मदिवस विविध उपक्रमातून साजरा करण्यात येतो. यावर्षी जि. प. शाळेतील बालगोपालांना प्रवीण नांदे यांच्यातर्फे स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. अंगणवाडी मधील बालकांना टिफिन बाक्स व खाऊचे वाटप, नाचणगाव मंडळ अध्यक्ष जयश्री मोकादम यांच्यातर्फे भजन मंडळातील महिलांना ब्ल्यूटुथ स्पिकर भेट म्हणून देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयंत येरावार, माधुरी इंगळे, नीलिमा पळसकर, रीना जयस्वाल, शुभांगी कासार, चंदा ढगे, संगीता भोयर, वनमाला केवटे, सुनीता डवरे, वैशाली नांदे, पल्लवी काकडे, पूजा खटोले, वैष्णवी काकडे, भजनी मंडळाच्या सदस्य आशा खटोले व त्यांचा गट, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, मुख्याध्यापक गणवीर, आदी उपस्थित होते.