कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे १३६ टक्के काम कौतुकास्पद : सोमण

आरोग्य मित्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा

    दिनांक :15-Jul-2026
Total Views |
वर्धा,

health workers honoured कोरोनानंतर आरोग्य क्षेत्राला बळकट करण्याचे काम शासन व प्रशासन स्तरावरून होत आहे. अशातच वर्धा जिल्ह्याने कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत केलेले १३६ टक्के काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले.
 


ZAvfd 
मंगळवारी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सिंधूताई सपकाळ सभागृहात आयोजित आरोग्य मित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात सन २०२५-२६ मध्ये उत्कृष्ठ काम करणार्या आरोग्य संस्था, सर्जन, अधिकारी, कर्मचारी, आशा स्वंयसेविका व एका मुलीवर शस्त्रक्रिया करणार्या दाम्पत्यांना सन्मानित करण्यात आले. मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानदा फणसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनिषा कुरसंगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, डॉ. सुवर्णा खोब्रागडे, डॉ. संदीप नखाते आदींची उपस्थिती होती.
आरोग्य मित्र गौरव पुरस्कार कार्यक्रमात ३६ आरोग्य संस्था, सर्जन, अधिकारी, कर्मचारी यांना प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर १०० टक्के काम करणार्या कर्मचार्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच एका मुलीवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करणार्या दाम्पत्यांचा साडी-चोळी, शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याशिवाय क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग विभागामध्ये सर्वोकृष्ट काम करणार्या कर्मचार्यांनाही गौरविण्यात आले.संचालन डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी केले. आभार डॉ. संदीप नखाने यांनी मानले. यशस्वीतेसाठी आम्रपाली मारे, शेख हुसेन, गजानन पिसे, शशिकांत अरसड, गजानन थूल, प्रदीप लोखंडे, कविता बकाले आदींनी सहकार्य केले.