अनिल कांबळे,
नागपूर,
nagpur-news : पहिल्या पत्नीला तलाक न देता दुसरा निकाह करण्यासाठी बोहल्यावर चढलेल्या पतीला पत्नीने चांगलाच धडा शिकवला. पतीच्या विवाह समारंभात जाऊन तिने गोंधळ घालत पती व त्याच्या कुटुंबीयांना जाब विचारला. वाद झाल्यानंतर हे प्रकरण गिट्टीखदान पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. शेवटी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन ४६ वर्षीय पतीविरुद्ध मुस्लिम महिला (विवाहावरील हक्क संरक्षण) अधिनियम, २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक (वय ४६, रा. किल्ला महाल) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार ३६ वर्षीय महिलेचा रफिकसोबत ७ डिसेंबर २०१२ रोजी रीतिरिवाजांनुसार विवाह झाला होता. या दाम्पत्याला ८ वर्षांचा मुलगा असून त्याचा जन्म २०१७ मध्ये झाला आहे. २०२१ पासून आरोपी पती कोणतेही कारण नसताना पत्नीशी वारंवार वाद घालत होता. तसेच पती-पत्नीतील वैवाहिक वादाचे प्रकरण २०२४ पासून न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, ४ जुलै २०२६ रोजी आरोपी दुसरा विवाह करीत असल्याची माहिती तक्रारदार महिलेला मिळाली. त्यानंतर ती आपल्या नातेवाईकांसह गिट्टीखदान परिसरातील अवस्थी नगर चौक येथील हॉलमध्ये सुरू असलेल्या विवाह समारंभात पोहोचली.
यावेळी तिने आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने कथित रीत्या "मैं तुम्हे अभी तलाक देता हूँ" असे म्हणत "तलाक, तलाक, तलाक" असे तीन वेळा उच्चार करून तलाक झाल्याचे सांगितले. तसेच तिला धमकी दिली. तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी १४ जुलै रोजी महिला (विवाहावरील हक्क संरक्षण) अधिनियम, २०१९ च्या कलम ४ अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास गिट्टीखदान पोलिस करीत आहेत.की ट्रॉट यांचा अनुभव नवीन प्रशिक्षण स्टाफसाठी खूप उपयुक्त ठरेल. ते म्हणाले की, ट्रॉट केवळ खेळाडूंच्या विकासावरच लक्ष केंद्रित करणार नाहीत, तर ते आपला नेतृत्वाचा अनुभव, जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत काम करण्याचे आपले तत्त्वज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संघाचे व्यवस्थापन करण्याची आपली कार्यशैली देखील सांगतील.
भारतावरील ऐतिहासिक विजयानंतर नवीन तयारी
आयर्लंडने अलीकडेच भारताविरुद्धची दोन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका २-० ने जिंकून इतिहास रचला. भारताविरुद्धचा हा त्यांचा पहिला द्विपक्षीय मालिका विजय होता. आता संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची आणि २०२७ विश्वचषक पात्रता फेरीची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.