विद्यार्थी हिताचा निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन : अभाविप

(विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे अभाविपचे मंत्र्यांना निवेदन) * अभिविपच्या पदाधिकार्‍यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
गडचिरोली, 
abvp : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी संघटन शक्ती आहे, जी सर्वतोपरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करते. असे असताना विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. याकडे शासनाने प्राधाण्याने लक्ष देऊन त्या सोडवाव्या, अन्यथा येत्या काही दिवसात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यव्यापी आंदोलन करणार, असा इशारा अभाविपच्या पदाधिकार्‍यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रपरिदेतून दिला आहे.
 

abvp 
 
 
 
अभाविपने म्हटले आहे की, राज्यातील विद्यार्थ्यांसमोरील विविध शैक्षणिक, तांत्रिक, वैद्यकीय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, कौशल्य विकास व आरोग्य क्षेत्रात्रील प्रश्‍नांसदर्भात राज्य शासनातील विविध मंत्र्यांची भेट घेऊन करण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधूरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, इतर मागास व बहुजण कल्याण मंत्री अतुल सावे, कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोंढा आदी मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थी हिताच्या समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे.
 
 
 
विद्यापीठाच्या परीक्षा व निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करणे, मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण, प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचा लाभ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, खुल्या छात्रसंघ निवडणूका तसेच तंत्रशिक्षणातील संशोधन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संबंधित विविध प्रश्‍न आणि शिष्यवृत्ती वेळेत वितरीत करणे आदी मागण्यांचा समोवश निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने या विद्यार्थी हिताच्या निर्णयाचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा अभाविपच्या आंदोलनाला समोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. पत्रपरिषदेला अभाविप विदर्भ प्रदेश सहमंत्री सुजाण चौधरी, राहूल शामकुंवर, संकेत मस्के आदी अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.