भगवती गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशोत्सव

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Bhagwati Girls' Junior College लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेअंतर्गत संचालित भगवती गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. बारावीच्या विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी नवप्रवेशित विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
girls
 
 
यावेळी स्वागतगीत, सरस्वती स्तवनावरील नृत्य व विद्यार्थिनींची मनोगते सादर करण्यात आली. श्री. प्रकाश गभने यांनी विद्यार्थिनींना नवीन शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्राचार्या वनिता बहुरूपी, अतुल दोनोडे, प्रमोद कराडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. दीपा हटवार यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. मीनाक्षी गजभिये यांनी केले.
सौजन्य:वीरेंद्र जोगी,संपर्क मित्र