नागपूर,
Chief Minister's Pilgrimage Scheme मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर विभागातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बोधगयाकडे रवाना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रेला प्रारंभ केला.
या वेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री ॲड. आशिष जायसवाल, खासदार श्यामकुमार बर्वे, महापौर निता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, समीर मेघे, संजय मेश्राम आदी उपस्थित होते.Chief Minister's Pilgrimage Scheme नागपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक या यात्रेत सहभागी झाले असून, रेल्वे स्थानकावर त्यांना उत्साहात निरोप देण्यात आला.
सौजन्य:दीपक शेंडेकर ,संपर्क मित्र