भारत चव्हाण यांना दिग्रस पोलिसांची अखेरची सलामी

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
bharat-chavan : दिग्रस पोलिस ठाण्यात ग्रेड पोलिस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत असलेले भारत वंजी चव्हाण यांचे नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच दिग्रस पोलिस दलात शोककळा पसरली. पोलिसांनी भारत चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून सलामी देत अखेरचा निरोप दिला.
 
 
 
y16July-Bharat-Chavan
 
 
 
भारत चव्हाण हे एक महिन्यापासून वैद्यकीय रजेवर होते. नागपूरला उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आर्णी येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिग्रस पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक वैजनाथ मूंडे, सहायक उपनिरीक्षक मोरेश्वर राठोड, रवींद्र जगताप, करतारसिंग रुडे, रामराव मूजमूले, राजेश भगत, मिथून जाधव, रवींद्र मोर्लेवार, शाहू जाधव, दत्ता धुमारे, अभय इंगळे, कैलास देवकर, हाकीम शेख, गोविंद शेळके यांनी उपस्थित राहून भारत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारत चव्हाण यांच्यामागे पत्नी, एक मूलगा, एक मूलगी, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.