दिग्रसच्या सूतगिरणीचा धागा सातासमुद्रापार

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अभय इंगळे,
दिग्रस, 
digras-spinning-mill : रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाचे सूतगिरणी ठरली आहे. उत्कृष्ट धाग्याच्या गुणवत्तेमुळे गिरणीतील निघालेला धागा आता थेट चिनच्या बाजारपेठेत समुद्रीमार्गे रवाना झाला. या सूतगिरणीला कोरोनाच्या ब्रेक लागला होता. परंतु सुतगिरणीचे काम चालू ठेवून व अवघ्या चार वर्षात सूतगिरणी उत्पादनाखाली आली. मागील दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पणजीबद्ध असलेल्या सूतगिरणी पैकी उत्पादनाखाली आलेली ही एकमेव सूतगिरणी आहे. आता सूतगिरणीचा धागा थेट विदेशात पोहोचला आहे.
 
 

y16July-SootGirani 
 
 
 
पांढèया सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाèया यवतमाळच्या कापसाचा धागा हा उच्च प्रतीचा असतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे. हा उच्च प्रतीचा धागा तयार करण्यासाठी सर्व संचालक मंडळाचे सहकार्य, व्यवस्थापकीय संचालक बीएल बेहरा व त्यांच्या सर्व चमूचे उत्कृष्ट कार्य यामुळेच हे शक्य झाले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले व पालकमंत्री संजय राठोड यांच्या सहकार्यामुळे सूतगिरणीची उभारणी होऊन गिरणी उत्पादनाखाली आली अशी प्रतिक्रिया रामदास आठवले मागासवर्गीय सूतगिरणीचे अध्यक्ष महेंद्र मानकर यांनी दिली.
 
मागील 18 महिन्याच्या कार्यकाळात जवळपास साडेपाच हजार टन सुताचे उत्पादन झाले आहे. विशेष म्हणजे आपल्या सूतगिरणीला 25 हजार चात्यांची मान्यता आहे. परंतु सद्यस्थितीत 16 हजार 500 चाते चालू आहेत. दररोज 10 ते 12 टन सूत उत्पादित केल्या जाते. या सूतगिरणीत दोन पाळीमधून जवळपास 200 च्या वर कर्मचारी काम करत आहेत. येणाèया काळात लवकरच 25 हजार चाते चालू होतील व शेकडो लोकांना रोजगार मिळेल.
चिनच्या विशेष चमुच्या माध्यमातून सूतगिरणीतील उत्पादित होणाèया धाग्याचे परीक्षण झाले. वेगवेगळ्या चाचण्या झाल्या, त्यातून यशस्वी झाल्या नंतरच चीनच्या बाजारपेठेने धाग्याला मान्यता दिली. अजून इतर देशांची धाग्याला मागणी आहे, दिग्रस करांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे, असे संस्थापक अध्यक्ष मिलिंद मानकर यांनी सांगितले. यावेळी सूतगिरणीचे संचालक प्रा. मधुकर वाघमारे, अविनाश कुलदीपके, धर्मराज गायकवाड गिरणीचे बीएल बेहरा, श्रेयश मानकर व इतर सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते.