सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएचा छापा

४ हजार किलो निकृष्ट खाद्यपदार्थ जप्त

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
पुणे
fda raids लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल याला दरीत ढकलून ठार मारल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिया गोयल हिच्या कुटुंबीयांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बुधवारी सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांच्या पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील दुकानावर छापा टाकून ते सील केले. या कारवाईत सुमारे ४ हजार किलो निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत ८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
 

fda raids market yard shop linked to siya goyal family, seizes 4000 kg substandard food items 
FDAचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बुधवारी दुपारी विभागाच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरातील संबंधित दुकानाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. दुकानातील साठ्याची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्याने ते ताब्यात घेण्यात आले आणि दुकानावर तत्काळ सीलची कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुकान आवश्यक व्यावसायिक परवान्याशिवाय सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासणीवेळी दुकानात परवाना किंवा त्याची प्रत उपलब्ध नव्हती. तसेच, साठवून ठेवलेल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता अन्नसुरक्षेच्या निर्धारित निकषांनुसार नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा’ (Food Safety and Standards Act) अंतर्गत संबंधित दुकानदाराविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती FDAकडून देण्यात आली आहे. तसेच, दुकानदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, पुण्यातील मार्केट यार्ड हे राज्यातील प्रमुख घाऊक व्यापार केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री केली जाते. अनेक किरकोळ व्यापारी येथून माल खरेदी करून राज्यातील विविध भागांत विक्री करतात. त्यामुळे FDAच्या या कारवाईकडे व्यापारी तसेच ग्राहकांचे लक्ष लागले आहे.