पिवळ्या सोन्याला १८ हजारांचा विक्रमी भाव

मालेगाव तालुक्यात हळद लागवडीत प्रचंड वाढ!

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
मालेगाव,
turmeric cultivation in malegaon गेल्या काही काळापासून पारंपरिक पिकांना बगल देत मालेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी नगदी पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यंदा हळदीला बाजारपेठेत मिळणारा तब्बल १८,००० चा ऐतिहासिक भाव पाहता, शेतकर्‍यांसाठी हळद पीक पिवळे सोने ठरत आहे. हळद लागवडीतून मिळणारे भरघोस उत्पादन आणि त्यातून मिळणारे बक्कळ उत्पन्न लक्षात घेता, तालुक्यात यंदा हळद लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे.
 

halad 
 
बाजारपेठेत हळदीला मिळणारा १८,००० चा सर्वोच्च दर हा आजवरचा सर्वोत्तम भाव मानला जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होत आहेत. हळदी पासून भरघोस नफा व उत्पन्न शेतकर्‍यांना मिळत आहे. त्यात इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत हळदीला एकरी खर्च वजा जाता मिळणारे उत्पन्न खूप जास्त आहे. योग्य नियोजनामुळे एकरी उत्पादनही चांगले निघत असल्याने शेतकर्‍यांना हा सौदा फायदेशीर वाटत आहे.
 
हळदीचे वाढते क्षेत्र पाहता मालेगाव तालुक्यातील कृषी तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. हळद लागवड करताना गादीवाफा पद्धतीचा वापर करावा. बेणे प्रक्रिया करूनच लागवड करावी. जेणेकरून कंदकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल. जास्त उत्पन्नाच्या मोहात घाई न करता योग्य व्यवस्थापन ठेवल्यास हा पिवळा सुवर्णकाळ शेतकर्‍यांचे नशीब बदलू शकतो. सध्या मालेगाव तालुक्यात ठिकठिकाणी मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद लागवड करीत आहेत. पिवळ्या सोन्याने शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येऊ शकते हेच लक्षात घेऊन असंख्य शेतकर्‍यांचा कल हळद लागली कडे दिसत आहे.turmeric cultivation in malegaon त्यामुळे तालुक्यात शेतकरी आपापल्या परीने दोन एकर चार एकर जसे शक्य होईल तशा प्रकारे हळद लागवडीला प्राधान्य देत आहे व त्यामुळे तालुक्यात हळद लागवडीचे क्षेत्र वाढत आहे, इतर पिकापेक्षा उत्पन्नात हळद पासून मिळणारे उत्पन्न हे अधिक असल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात आले आहे.