नागपूर,
Inner Wheel Club of Nagpur South इनरव्हील क्लब ऑफ नागपूर साऊथच्या वतीने पदग्रहण समारंभात 'प्लास्टिक-मुक्त जीवन' प्रतिज्ञा मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुण्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मनीषा चौधरी यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी अध्यक्षा कविता दुरुगकर, सचिव डॉ. रीमा खराबे, कोषाध्यक्ष डॉ. मनाली काणे, डॉ. वंदना खेडीकर तसेच सदस्यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याची प्रतिज्ञा केली. Inner Wheel Club of Nagpur South इनरव्हीलच्या लोगो असलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पुढील काळात शाळा, महाविद्यालये व बाजारपेठांमध्ये राबविण्यात येणार आहे.
सौजन्य:सतीश तोडासे,संपर्क मित्र