पाऊस नसल्याने खरीप हंगाम संकटात

शेतकèयांच्या नजरा आभाळाकडे

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
kharif-season : तालुक्यात व परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकèयांची चिता दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत मोठ्या आशेने केलेली हळदीची लागवड उष्णतेमुळे धोक्यात आली असून कापूस, तूर, सोयाबीन व इतर खरीप पिकांची कोवळी रोपे करपू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
 
 
 
j
 
 
 
यंदा मान्सूनच्या पावसाने सुरुवातीला हजरी लावली असली तरी त्यानंतर दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्यान कमी झाला आहे. परिणामी हळदीची लागवड अनेक ठिकाणी जमिनीतच नासण्याची भीती निर्माण झाली आहे. कापूस व सोयाबीनच्या कोवळ्या पिकांवर उप्णतेचा मोठा परिणाम होत आहे. विहिरी व बोअरवलमधील पाणी साठा दिवसेंदिवस घटत असल्याने पिकांना पाणी देणे शेतकèयांसाठी कठीण झाले आहे.
 
 
हळद, कापूस, तुर, उडीद, मुग व सोयाबीन ही खर्चिक पिक असल्याने बियाणे, खते, औषधे व मजुरीवर मोठा खर्च करूनही अपेक्षित व समाधान कारक पाऊस न झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास कापूस, सोयाबीन, हळद तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतन वाट पाहत असून, वेळेत पाऊस झाला तरच खरीप हंगाम सावरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.