संस्कृत भारतीच्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे हेच खरे महाकवी कालिदास यांना अभिवादन : प्राचार्य धनंजय किंबहूणे

*संस्कृत भारती बुलढाणाच्या वतीने महाकवी कालिदास दिन-समारोह उत्साहात

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
dhananjay-kimbhune : संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृत भाषा ही संस्कारक्षम आहे. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, पाठांतरक्षमता, अचूक निर्णय क्षमता, परिश्रमी वृत्ती, चिकाटी, सातत्य हे सद्गुण आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा उपयुक्त आहे. स्वंय-व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी संस्कृत भाषा सहाय्यभूत ठरते. दैनदिन जीवनात संस्कृत भाषेचा उपयोग करणे ही वर्तमान काळाची गरज आहे. विद्यार्थी वर्गाने स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आधुनिक गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहास या विषयांसोबतच संस्कृत भाषेचा अभ्यास केल्यास त्यांचे व्यक्तीमत्व विकसित होऊ शकते, आपण आपल्या जीवनातील सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो. संस्कृत भारतीच्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे, महाकवी कालिदास दिनानिमीत्त त्यांनाखरे अभिवादन ठरेल. असे प्रतिपादन समारोहाचे अध्यक्ष एडेड हायस्कूलचे प्राचार्य धनंजय किंबहूणे यांनी केले.
 
 
kl
 
दि. १५ जुलै रोजी संस्कृत भारती आणि एडेड हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाकवी कालिदास दिन समारोह एडेड हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर या प्रसंगी प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापिका उषा निकाळजे, पर्यवेक्षक संतोष गंगरस, संस्कृत भारती विभाग संयोजक प्रा. विजय जोशी, प्रमुख वक्ते डॉ. शारदा वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. संस्कत भारतीच्या वतीने सर्व मान्यवर आणि संस्कृत शिक्षकांचा संस्कृत संभाषण संदेश हा विशेषांक व पुष्पगुष्छ देवून सन्मान करण्यात आला.
 
 
बुलढाणा नगर शाखेच्या पत्राद्वारा संस्कृत विभाग प्रमुख आणि प्रमुख वक्ते डॉ. शारदा वाघ यांनी आपल्या प्रतिपादनात महाकवी कालिदास यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. संस्कृत महाकवी कालिदासाचे व्यक्तीमत्व म्हणजे प्रतिभा संपन्न महान साहित्यिकांचा अद्भुत अविष्कारच होय. महाकवी कालिदास यांनी कठोर तपश्चर्या करून ज्ञान, विद्वत्ता संपादित केली. मेघदूत, कुमारसंभव आदि महाकाव्य, नाटकांचे लेखन केले. निसर्ग सौंदर्या आणि मानवी जीवन यामधील सहसंबंध त्यांनी आपल्या साहित्य निर्मितीद्वारे प्रकट केला. संस्कृत साहित्य सृष्टी मध्ये महाकवी कालिदास यांचे अनमोल योगदान आहे. भारतीय संस्कृती मध्ये त्यांचे अढळ, प्रेरणादायी स्थान व महत्व आहे.
 
 
संस्कृत महाकवी कालिदास दिन समारोहाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन श्री. सरस्वती देवी माता, महाकवी कालिदास यांना पुष्पहार व पूजन करून झाला. ध्येय मंत्र पठन, एडेड हायस्कूलच्या वर्ग ८,९, व १० मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी संस्कृत भाषा माध्यमातून वैयक्तिक गीत, सामुहिक गीत, सुभाषित माला कथा, कवी कालिदास यांचे बद्दलची माहिती सादर केली. प्रास्ताविक परिचय, प्रा. विजय जोशी, सुत्रसंचलन श्रुती वैराळकर, अक्षरा फाटे, आभार प्रदर्शन नगर उपाध्यक्ष शिवानंद भुसारी, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी संतोष गंगरस, उषा निकाळजे, बाळकृष्ण आयचित, अजय ताम्हण, सुलभा जोशी आदिंनी परीश्रम घेतलेत. सामुहिक शांती मंत्र पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.