अनिल कांबळे,
नागपूर,
nagpur-crime : नूडल्स तयार करणाऱ्या कंपनीत नोकरी असताना एका कर्मचाऱ्याने सहकारी प्रेयसीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने लग्नाची गळ घातली असता तिचा बळजबरी गर्भपात केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन लकडगंज पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. संघर्ष सुभाषकुमार जयस्वाल (वय ३१, लकडापुल रोड, महाल) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय तरुणी एमआयडीसीतील एका नूडल्स बनविणाऱ्या कंपनीत नोकरीला होती. तेथे संघर्ष हा नव्याने जॉईन झाला होता. २४ एप्रिल २०२३ मध्ये संघर्षने तरुणीशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विश्वासात घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने स्वत:च्या घरी नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती झाली. तरुणीने लग्नाची मागणी केली असता संघर्षने तरुणीचा बळजबरीने गर्भपात करवून घेतला. या प्रकरणी तरुणीने लकजगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला.