नागपूर,
Nataraj Art and Culture Center संस्कृत सखी सभा आणि नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास यांच्या मेघदूत व अन्य संस्कृत वाङ्मयावर आधारित 'मेघदूत अन्त्याक्षरी स्पर्धा' रविवारी (दि. १९) दुपारी ३.३० वाजता नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर, धरमपेठ येथे होणार आहे.
संस्कृत साहित्याची गोडी निर्माण करणे आणि अभिजात संस्कृत वाङ्मयाचा परिचय रसिकांना करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश असून, साहित्यप्रेमी, संस्कृत अभ्यासक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र